- नैसर्गिक घटकांचे स्पष्टीकरण प्रयोजन कारणे लागू करून देण्याचा प्रयत्न केल्याने विज्ञानास घातक वळण लागते. नैसर्गिक घटकांमागे काही उद्दिष्ट असतेच असे मानले, तरी आतापर्यंत ते शोधून काढता आलेले नाही. आपणास माहीत असलेले सर्व वैज्ञानिक नियम हे घटीतांमागचे निमित्त कारण सांगतात; उद्दिष्ट नाही.
- जळत्वाच्या एका तत्त्वामुळे जड वस्तूंच्या गतीविषयीचे शास्त्र मन वा आत्मा यांचा तथाकथित प्रभाव झुगारून देऊन विकसित करणे शक्य झाले. त्यामुळे पूर्णपणे भौतिक तत्त्वांवर आधारित अशाbपदार्थविज्ञानाचा पाया घातला गेला. वैज्ञानिक किती का धार्मिक प्रवृत्तीचा असेना, आता अशाच प्रकारच्या पदार्थ विज्ञानावर विश्वास ठेवतो.
- प्राण्यांना माणसाळवण्या पेक्षाही महत्त्वाचा होता शेतीचा शोध. मात्र या शोधापायी धर्मांमध्ये रक्तरंजित रूढींचा शिरकाव झाला व शतकानूशतके त्या रुढी सुरू राहिल्या.
- झेनोफेन्सने म्हटले, की 'माणूस स्वतःच्या कल्पनेनुसार आपले देव तयार करतो.'
-पृथ्वी गोल आहे,हे ग्रीकांना अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच कळले होते.
- पुनरुज्जीवनाच्या युगात मात्र ग्रीकांनी या ज्ञानशाखेत काय काम करून ठेवले आहे, ते हळूहळू बाहेर येऊ लागले. त्याने आधुनिक विज्ञानाच्या उदयास मोठाच हातभार लावला.
- आपल्याला जर निसर्ग नियम उर्फ भौतिक नियम समजून घ्यायचे असतील, तर सर्व प्रकारचे नैतिक आणि सौंदर्यविषयक पूर्वग्रह बाजूला ठेवावे लागतील.
- ब्रिटन मधील शास्त्रज्ञांची धर्मश्रद्धा डळमळीत होण्यास तीन गोष्टी कारणीभूत झाल्या : भूगर्भशास्त्राचा अभ्यास, डार्विन आणि उत्क्रांतीचे तत्व.
- वैज्ञानिक दृष्ट्या पूर्णपणे निरोपयोगी ठरलेली अत्यंत उदात्त संकल्पना म्हणजे 'आत्मा'.
-बर्ट्रान्ड रसेल (नाही लोकप्रिय तरी )
#सुविचार, #विवेक, #vlog, #google, #facebook, #विचारधन, #art #manojbobade #poetry, #literature, #साहित्यकला, #humanity, #instagram, #लेखक, #कवी, #blog, #सपोर्ट,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा